खबरदार,,,,,, प्रा. रामदास झोळ सर यांची बदनामी कराल तर जशास तसे उत्तर देऊ,, प्रसिद्धी व विकास रोखण्यासाठी खोट्या बातम्या देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. -रवि गोडगे.(स्वा.शेतकरी संघटना)
करमाळा प्रतिनिधी: अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आगामी विधानसभेचे उमेदवार प्राध्यापक रामदास झोळ सर यांची प्रसिद्धी रोखण्यासाठी काही मंडळीं त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रसिद्धी देत आहे तेव्हा वेळीच सदर नाहक बदनामी थांबवावी अन्यथा बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ असे रोखठोक आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा रवी गोडगे यांनी केले आहे ते बोलताना पुढे म्हणाले की करमाळा तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने प्राध्यापक रामदास झोळ अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहेत. सध्या त्यांनी शेतकरी व कष्टकरी शेतमजूर यांची मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून देवळाली या ठिकाणी शैक्षणिक संकुल उभारण्याची तयारी दाखवली आहे हे काम लवकरच पूर्ण होईल त्याचबरोबर करमाळा तालुक्यात आरोग्य आणि मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकी लढवणार असल्यामुळे त्यांना मिळणारा जनप्रतिसाद मोठा आहे. हीच बाब अनेक लोकप्रतिनिधींना खटकत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सरांचा जो अपप्रचार चालवलेला आहे तो लवकरच थांबवला जावा अन्यथा त्यांना स्वाभिमानी स्टाईलने प्रत्युत्तर देण्यात येईल. अनेक दिवसापासून जो सर यांनी ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बाकडे वाटप, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सहकार्य केले आहे.पिण्यासाठी पाणी तसेच वृक्षारोपण रस्ता आणि इतर सार्वजनिक कामासाठी मोलाचे योगदान दिलेल आहे. झोळ सर यांना बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र असू शकतं असा ही संशय त्यांनी व्यक्त केला. परंतु जनता हुशार आहे जनतेला सर्व माहीत असून या खोट्या बातम्याचा जनतेवर काही परिणाम होणार नाही हे मात्र निश्चित आहे. ज्या कारखान्याचा आणि सरांचा काही एक संबंध नसतानाही विनाकारण प्रसिद्धी रोखण्यासाठी काहीतरी षडयंत्र रचले जात आहे. ही वेळीच थांबवले जावे अन्यथा जशास तसे उत्तर येण्यासाठी वेळ लागणार नाही. असे गोडगे बोलताना म्हणाले