महाराष्ट्र

करमाळा बाजार समितीत उडदाचे लिलाव सुरळीत सुरू , तब्बल २५००० क्विंटलची आवक : उपसभापती शैलजा मेहेर

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा बाजार समितीत उडदाचे लिलाव सुरळीतपणे सुरू असून मंगळवारी ८००० क्विंटल इतकीआवक होवून ६५०० ते ८००० पर्यंत उडदाला दर मिळाला असून चालू हंगामात तब्बल २५००० क्विंटल आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या उपसभापती सौ शैलजा मेहेर यांनी दिली .करमाळ्याचे माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांच्या सक्षम नेतृत्वाखाली करमाळा बाजार समितीचे कामकाज अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून
करमाळा बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या शेतमालाचे लिलाव उघडपद्धतीने शेतकऱ्यांच्या समक्ष शेतमालाची प्रतवारी करून केले जातात.

शेतमाल विक्रीस शेतकऱ्यास लिलावातील दर मान्य असल्यास शेतकऱ्याची संमती घेतली जाते व त्यानंतर त्वरित मापे व २४ तासाच्या आत त्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची पट्टी दिली जाते. यावर बाजार समितीचे कडक नियंत्रण आहे. शेतमालाचा भाव बाजार समिती ठरवत नाही. FAQ दर्जाच्या शेतमालाला हमीभावापेक्षा जादा दर दिला जाईल याकडे बाजार समितीचा कटाक्ष आहे. NON-FAQ दर्जाचा शेतमाल शेतकऱ्यांच्या संमतीनेच विक्री करणेबाबत आडते व्यापाऱ्यांना बाजार समिती प्रशासनाकडून सूचना दिलेल्या आहेत.

चालू खरीप हंगामामध्ये करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास २३५०० हेक्टर इतक्या क्षेत्रावर इतक्या क्षेत्रावर उडीदाची लागण झाल्यामुळे व योग्य वेळी पाउस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उडीदाचे उत्पादन होऊन आवक मार्केट यार्डमध्ये सुरु झालेली आहे .चालू हंगामातील उडीदाच्या बाजारभावाचे अवलोकन केले असता प्रतवारीनुसार किमान ६००० पासून ८७०० पर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे. रोजच्या सरासरी दराचा विचार करिता हमीभावाने दर उडीदाला मिळत आहेत.

आसपासच्या बाजार समित्यांसह राज्यभरातील बाजार समित्यांमधील आवक व दराचे अवलोकन केले असता करमाळा बाजार समितीत उडदाला चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे . मार्केट यार्डमधील आडते,खरेदीदार व्यापारी व हमाल तोलारांची संख्या याचा विचार करिता उडीदाच्या आवकेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने लिलाव व मापे या प्रक्रीयेस थोडा विलंब होत असला तरी रात्री उशिरापर्यंत संबंधित सर्व घटक शेतमाल विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्याची यथाशक्ती कसोशिने प्रयत्न करीत असल्याचे देखील सौ. मेहेर यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button