बेकायदेशीरपणे वारसनोंद लावणाऱ्या माण तालुक्यातील तत्कालीन ग्रामसेवक वर कारवाई करावी -ज्ञानदेव अहिवळे

टाइम्स 9 मराठी न्यूज
सातारा जिल्ह्यातील माण(दहिवडी )तालुक्यातील इंजबाव येथील रहिवाशी कै. महादेव राऊ अहिवळे यांच्या मालकीचे पत्र्याचे घर आणि मोकळी जागा अशी सुमारे साडे पाच गुंठे जागा मौजे इंजबाव हद्दीत आहे.
यातील मूळ वारस महादेव अहिवळे यांचे 27-7-2004रोजी निधन झाले.त्यानंतर त्यांचे पश्चात पत्नी द्रौपदा महादेव अहिवळे, मुले -तुकाराम, ज्ञानदेव, भागवत, राजाराम, तर मुली -बकुळा, रुक्मिणी, भामाबाई असे वारस आहेत. परंतु आठ वारस असताना वडिलांचे मृत्यूपत्र देखील नसताना तुकाराम अहिवळे यांनी तत्कालीन ग्रामसेवक यांचे बरोबर आर्थिक देवाण -घेवाण करून केवळ स्वतःची वारस म्हणून मिळकती वर नोंद लावली. त्यानंतर 15-6-2013रोजी तुकाराम यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पश्चात तुकाराम यांची मुले शंभुदेव, शिवाजी आणि तुकाराम अहिवळे यांची पत्नी गंधारी यांची नावे वारस म्हणून लावण्यात आली.
त्यानंतर 2022 मध्ये अकलूज येथे रहिवाशी असलेले ज्ञानदेव अहिवळे व राजाराम अहिवळे हे काही कामानिमित्त इंजबाव येथे गेले असता सदर मिळकत ही शंभुदेव व शिवाजी यांनी इंजबाव येथील गणेश ज्ञानदेव साळुंखे यांना मोकळी जागा असलेली मिळकत विकली.असे समजले.
वास्तविक पाहता, शंभुदेव आणि शिवाजी यांनी गणेश साळुंखे यांचेकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. त्याची मुदतीत परतफेड न झाल्याने त्यांनी सदरची जागा साळुंखे यांना विकली.
त्यानंतर अकलूज येथील ज्ञानदेव अहिवळे, राजाराम अहिवळे, शुभम अहिवळे यांनी 24-1-2023रोजी इंजबाव येथील ग्रामसेवक यांना यासंदर्भात तक्रारी अर्ज दिला आहे.
या अर्जात असे नमूद करण्यात आले आहे कि, आम्ही सर्वजण कै. महादेव अहिवळे यांचे वारस असताना, तसेच याबाबत कायदेशीर पणे मिळकत वाटप झालेली नसताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी या मिळकती मधील काही हिस्सा परस्पर विकण्यात आला आहे. तसेच या जागेवर गणेश साळुंखे यांनी बेकायदेशीर पणे बांधकाम सुरु केले आहे.
याची चौकशी होऊन सदर बेकायदेशीर बांधकामास स्थगिती मिळावी. अशी विनंती करण्यात आली आहे.
तसेच यासंदर्भात म्हसवड येथील वकील डी. एल. हांगे यांचे मार्फत इंजबाव येथील ग्रामसेवक यांचेकडे हरकती संदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे.
सदर नोटीशीत असे नमूद करण्यात आले आहे कि,अशिल ज्ञानदेव महादेव अहिवळे पो. इंजबाव, ता. माण जि. सातारा सध्या रा. संग्राम नगर, नऊचारी, अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापुर यांनी दिलेल्या लेखी आणि तोंडी माहिती व अधिकारावरून तसेच दाखविलेले कागदपत्रावरून या नोटिसीने
विनंती करण्यात आली आहे. इंजबाव ग्रामपंचायत कार्यालयातील कै. महादेव अहिवळे यांचे नावे असलेला ग्रामपंचायत मिळकत नंबर 110, तसेच सध्याचा असणारा नं,117 यामध्ये कै. तुकाराम यांचे वारस शंभुदेव व शिवाजी यांचे नावे असणारा अर्जदार व गैरअर्जदार शंभुदेव तुकाराम अहिवळे व शिवाजी तुकाराम अहिवळे यांची एकत्र कुटुंबाची वडिलार्जीत सदरची मिळकत असुन, सदर जागेत बेकायदेशीरपणे शंभुदेव तुकाराम अहिवळे व शिवाजी तुकाराम अहिवळे हे सदर जागेची विक्री झाली असे म्हणुन याच गावातील गणेश ज्ञानदेव साळुंखे यांना अनाधिकाराने नवीन घर बांधकाम करण्यासाठी खोद काम करण्यास मदत करत आहेत. सदर अर्जदार यांचे मुळ कुटुंबातील जागेत शासनाच्या योजनेचा शिवाजी तुकाराम अहिवळे यांनी जनावरांच्या गोठयाचा मोफत योजनेचा फायदा घेतलेला होता. त्यासाठी मिळालेल्या शासनाची जमिन बेकायदेशीरपणे विक्री करून शासनाची फसवणुक केलेली आहे.याबाबत योग्य ती फौजदारी कारवाई करणे योग्य होणार आहे.

अशा परिस्थितीत त्यांनी बेकायदेशीर बांधकाम करू नये व अर्जदार यांचे कायदेशीर मालकी हक्कावर बाधा आणु नये.तसेच सदर बाबत स्थानिक स्वराज्य संस्था यांचे शासनाचे अधिकारी म्हणुन आपणास सदरची बेकायदेशीर कृत्य थांबवण्यास सदर नोटिसीने कळविणे भाग पडत आहे. सबब या नोटिसीने तुम्हास कळविण्यात येते की, सदर जागेत होत असलेले बेकायदेशीर काम थांबविण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे यासंदर्भात अकलूज येथील ज्ञानदेव अहिवळे यांनी म्हसवड पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक यांचेकडे देखील तक्रारी अर्ज दिला असून, ग्रामपंचायत ने संबधीत व्यक्तीला बांधकाम थांबविण्या संदर्भात नोटीस देऊन सुद्धा अद्याप बांधकाम थांबविले नाही. त्यामुळे हे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे. असा तक्रारी अर्ज म्हसवड पोलीस ठाणे येथे देण्यात आला आहे.
चौकट :-
दरम्यान यासंदर्भात बोलताना तक्रारदार ज्ञानदेव अहिवळे यांनी सांगितले कि, कै. महादेव अहिवळे यांचे इतर वारस जिवंत असताना देखील केवळ स्वार्थासाठी तत्कालीन ग्रामसेवक यांचेशी आर्थिक देवाण -घेवाण करून बेकायदेशीर वारस नोंद लावणारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी,ग्रामसेवक,यांचेवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा कायदेशीर मार्गाने दाद मागणार.
अहिवळे कुटुंब.अकलूज.




