भिवंडी तालुक्यातील हत्तेचा सुपारी बाज सूत्रधार सख्खा लहान भाऊ

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून लहान सख्या भावाने मोठ्या भावाची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना भिवंडी तालुक्यात घडली असून या गुन्ह्यातील सर्व आरोपींना पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वसई गणेशपुरी पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 72 तासांच्या आत केळवा पोलीस ठाणे हद्दीतील विळंगी गावातून अटक करून त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
भिवंडी तालुक्यातील शेडगाव गावातील परेश टोलाराम पाटील वय वर्ष (40) हा इसम 12 मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने वसई येथे कामावर जाण्यासाठी निघाला होता. त्यांची दुचाकी भिवंडी शेडगाव मोरीजवळ आल्यावर अज्ञात तीन इसमानी त्यांना थांबून त्यांच्यावर हत्याराने डोक्यात वार करून त्यांची हत्या केली होती. व हे सर्व आरोपी वाहनाचा वापर करून वसई दिशेने पळून गेले होते.

याबाबतची फिर्याद मयत परेश पाटील यांचा लहान भाऊ नरेश पाटील यांनी गणेश पुरी पोलीस ठाण्यात 13 मे रोजी केली होती. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनमोल मित्तल अपर पोलीस अधीक्षक तथा स्व. कार्यभार ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन या गुन्ह्यातील आरोपींना जलद गतीने तपास करून अटक करण्याच्या सूचना राहुल झाल्टे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेशपुरी विभाग यांना दिल्या होत्या.
त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण तसेच तपास पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी या तपास पथकांना मार्गदर्शन केले यानुसार संदीप गीते वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे ग्रामीण कमलेश बच्छाव पोलीस निरीक्षक गणेशपुरी पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, शरद सुरळकर, उमेश शिरड,मयूर शेवाळ, निरंजन पाटील यांनी 200 सीसीटीव्ही पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास केल्यावर आरोपी आणि त्यांनी गुन्हात वापर केलेली गाडी केळवा पोलीस ठाणे हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यावर या तपास पथकाने केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार जयदीप सांबरे आणि पोलीस हवालदार जनाठे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी दिनांक 15 मे रोजी त्यांच्या पोलीस खात्यातील अनुभवाचा युक्तीचा वापर करून आपल्या खबरीन सोबत या पथकांना विळंगी गावात घेऊन जाऊन त्यांच्या राहत्या घरातून राकेश भगवान पाटील वय वर्ष (35 ), प्रेमजीत मधुकर घरत वय वर्ष( 38),आणि दक्षस भानुदास भोईर वय वर्ष (24) मूळचा राहणारा खार्डी या तिघांना 72 तासाच्या आत अटक करून त्यांची सखोल चौकशी केल्यावर त्यांनी मयत परेश पाटील चा सख्खा लहान भाऊ नरेश पाटील राहणार भिवंडी शेडगाव यांनी दहा लाख रुपयाची सुपारी देऊन ही हत्या करून घेतली आहे. अशी कबुली दिल्यावर नरेश पाटीलला ही पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे.



