सामन्यासाठी मा. आ. सदाभाऊ खोत बनले आरोग्यदूत

सांगली जिल्हा प्रतिनिधी: आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज रिपोर्टर, मो 8007 93 2121
सांगली : घबकवाडी तालुका वाळवा येथील अमोल घबक यांच्या पायावरती शस्त्रक्रिया करायची होती त्यासाठी त्यांनी मा.आ.सदाभाऊ खोत यांची भेट घेतली व त्यांनी मुंबई येथील केम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मदत केली,जवळपास तीन महिने ऍडमिट केले होते.
वेगवेगळ्या अशा तीन सर्जरी करायच्या असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी एवढे दिवस ऍडमिट करावे लागले. आपल्या भागामध्ये जवळपास याचा खर्च पाच ते सहा लाख रुपये डॉक्टरांनी सांगितले होते पण मा.आ. सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून त्यांचे पूर्णपणे मोफत ऑपरेशन झाले. ते घरी आल्यानंतर त्यांची घरी जाऊन सागर भाऊ खोत यांनी भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली.
नक्कीच सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून अशी सर्वसामान्य माणसांची सेवा करून ते ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्यदूत म्हणून लाभले आहेत, अशा प्रकारे वाळवा शिराळा तालुक्यातील गरीब कुटुंबांच्या गरजेला देवदूत म्हणून उपस्थित राहून त्यांना आवश्यक ती मदत पुरव असतात. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील युवकांना एक वेगळा उत्साह काम करण्यासाठी मिळत असतो नक्कीच अमोल घबक यांचा झालेला आनंद बघून सागर खोत आणि उपस्थित भाऊक झाले.



