खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपातील
एका आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजुर

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
वकीलवस्ती ता.इंदापूर येथील खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील आरोपी दौलत नारायण भोळे यांचा अटकपूर्व जामीन बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती भाकरे मॅडम यांनी मंजूर केला.
घटनेची हकीकत अशी की , वकीलवस्ती ता. इंदापूर येथील आकाश धुमाळ याचेवर तलवारीने वर करून व बॅट ने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या वरून इंदापूर पोलिसांनी पोलिस स्टेशन ला भारतीय दंड विधान कलम 307,326,324,323,504,506 सह 34 व शस्त्र अधिनियम 4 व 25 प्रमाणे. राजू भोळे ,चिंतामणी भोळे व दौलत भोळे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.राजू भोळे व चिंतामणी भोळे यांना पोलिसांनी अटक केली होती तर दौलत भोळे यांनी ॲड.वजीर शेख यांचे मार्फत बारामती येथील जिल्हा सत्र न्यालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता.यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती बाकरे मॅडम यांनी अटकपूर्व जमीन मंजूर केला.यावेळी आरोपीच्या वतीने ॲड.वजीर शेख , ॲड.हसीना शेख , व ॲड.रणजित भोसले यांनी काम पाहिले.



