छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना समाजकंटकाद्वारे घातपाताच्या दृष्टीने झालीय काय याची सखोल चौकशी करा : नितीन झिंजाडे

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना समाजकंटकाद्वारे घातपाताच्या दृष्टीने झालीय काय याची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपचे करमाळा सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस याचेकडे एका निवेदनद्वारे केली आहे.या निवेदनात पुढे त्यांनी म्हटले आहे की,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील जनतेची अस्मिता दुखावली गेली आहे.यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे.

या सामाजिक दूषित वातावरणाचा राजकीय फायदा उचलण्यासाठी विरोधकांनी या घटनेला खतपाणी घाललेचे दिसून येत आहे.मुळात हा पुतळा आठ -नऊ महिन्यापूर्वी इंडियन नेव्हीने उभारला होता.इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांचा पुतळा उभारताना कसलाही हलगर्जीपणा करूच शकत नाही,कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरमार विषयी एक आदर्श धोरण होते त्यामुळे इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी करताना कोणतीही चूक करु शकत नाही. तरीही घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे.त्यामुळे या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी व्हावी.राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.

लोकांच्या लोकभावनेचा व सामाजिक वातावरण कलुशीत करण्यासाठी अज्ञात समाजकंटद्वारे छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याची मोडतोड झालीय काय? या दृष्टीने काही घातपाती कृत्य केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना समाजकंटद्वारे घातपाताच्या दृष्टीने झालीय काय याची सखोल चौकशी होऊन राज्यातील जनतेसमोर सत्य आणावे ही विनंती करण्यात आली. आहे.



