पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकात ऑन ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640
पालघर जिल्ह्यातीलसफाळे येथे राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा डहाणू रेल्वे स्थानक परिसरात ऑन ड्युटी शॉक लागून मृत्यू झाला आहे..ही घटना शुक्रवारी दुपारी डहाणू रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे.
सफाळे पश्चिम चिखलपाडा येथे राहणारे (39) वर्षीय नवनाथ चिंतामण भोईर हे वडिलांच्या अपघाती निधनानंतर अनुकंप तत्वावर पश्चिम रेल्वेचा डहाणू वाणगाव दरम्यान येथील इलेक्ट्रिक पॉवर विभागामध्ये कार्यरत होते.

शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी नवनाथ भोईर हे त्यांचे वरिष्ठ अधिकारी अनुराग पाल यांच्या सांगण्यावरून भर पावसात डहाणू रेल्वे स्थानक ते फाटक परिसरात कार्यरत असताना त्यांना विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत रेल्वे अधिकाऱ्याने घटनास्थळी पाहणी केली असून भर पावसात जबरदस्ती अनुराग पाल या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवनाथ भोईर यांना विद्युत तारा टाकण्याचे काम सांगितल्यामुळे नवनाथ भोईर यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. असा आरोप नवनाथ भोईर यांच्या कुटुंबियांचा असून याबाबत अधिक तपास करण्यात यावा अशी मागणी नवनाथ भोईर यांच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.



