महाराष्ट्र

अकलूज नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपास दलित मुस्लिम चळवळीचा पाठिंबा…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आज केलेल्या बेमुदत संपास अकलूज च्या दलित मुस्लिम चळवळीतील कार्यकर्ते लालासाहेब अडगळे आणि आमीर मोहोळकर यांनी जाहीर पाठिंबा दिला…

आपल्या विविध मागण्यासाठी अकलूज नगर परिषदेच्या समोर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता त्या संपाला पाठिंबा देण्याचे काम दलित मुस्लिम चळवळीतील युवा कार्यकर्त्यांनी केले…

नगरपरिषद नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या पुढील प्रमाणे

१.)जुनी पेंशन योजना लागु करणे किंवा नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणी करणे.
२.) राज्य संवर्ग पदे सातवा वेतन आयोग अधिसुचनेत पदांचा समावेश करुन सेवार्थ नंबर मिळणे.
३.) सहायक अनुदान एक महिना आगाऊ देणे, सातव्या वेतन आयोग फरक व मागील महागाई फरक रक्कम मिळणे.
४.) राज्य संवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील जाचक अटी वगळणे.
५.) नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना १०,२०, ३०, लागु करणे.
६.) पदोन्नतीतील कोट्यातील रिक्त पद तात्काळ भरणे.
७.) मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परिक्षा तात्काळ MPSC मार्फत घेणे.
८.) सेवानिवृत्ती उपदान व रजा रोखीकरण शासनाकडे भरणे व स्थानिक कर्मचारी यांना निवृत्ती रक्कमांचे अनुदान मिळणे.
९.) धारणाधिकार सह नियुक्ती व बदली पदस्थापना करणे.

नगरपरिषद नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्या पुढील प्रमाणे

१.) वेतन शासन लेखा कोषागार मार्फत करण्यात यावे.
२.) सहायक आयुक्त /मुख्याधिकारी गट-ब (राजपत्रित) पदासाठी ६०%जागा राज्य संवर्ग पदोन्नतीने करण्यात याव्यात. (पदोन्नती ३०% व विभागीय परिक्षा ३०%)
३.) कर व प्रशासकीय, अम्निशमन आणि स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्ग वेतन श्रेणी ४२००/ $-१३ करावी.
४.) अभियांत्रिकी संवर्गातील अभियंता यांना इतर विभाग प्रमाणे पदनाम व वेतनश्रेणी लागु करावी.
५.) संवर्ग सेवेतील श्रेणी-अ पदास गट-ब (राजपत्रित) दर्जा आणि श्रेणी-ब पदास गट-ब( अराजपत्रित) दर्जा मिळणे.
६.) अ वर्ग नगरपरिषद CAFO पदावर संवर्ग सेवेतील लेखा अधिकारी नियुक्ती करावी.
७.) पाणीपुरवठा,मलनिस्सारण व स्वच्छता संवर्ग यांची वाढीव पदे निर्माण करावी.
८.) संगणक, अग्निशमन व विद्युत या संवर्गाची पदे नगरपंचायतींमध्ये निर्माण करावी.
९.) क वर्ग नगर परिषदांना उपमुख्याधीकारी हे पद निर्माण करावे.
१०.) राज्य संवर्ग श्रेणी-क पदांवर २५% जागा स्थानिक कर्मचारी स्वतंत्र परिक्षा किंवा सेवा ज्येष्ठताने भरावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button