शहर
माळशिरस विभाग माळशिरस गणेशोत्सव अनुषंगाने माळशिरस पोलीस ठाणे येथे मीटिंग संपन्न.

माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते मोबाईल नंबर 83 80 84 86 73
दिनांक 29 8 2024 रोजी माळशिरस पोलीस स्टेशन येथे माळशिरस पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटलांना व गणेश मंडळाच्या अध्यक्षांना माळशिरस पोलीस स्टेशन येथे मीटिंग आयोजित करण्यात आली यावेळी माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील व गणेश मंडळाचे अध्यक्ष हे सर्व उपस्थित होते .

यावेळी पोलीस पाटील व गणेश मंडळाचे अध्यक्ष यांना गणपती कार्यक्रमाचे नियोजन व महत्त्व सांगताना माळशिरस पोलीस स्टेशनचे पीआय नारायण पवार साहेब यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यास सांगितले व सर्व गणेश मंडळ अध्यक्षांना व पोलीस पाटील यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या



