“लाडकी बहीण योजना जमेना..कोरोना काळातील लाडक्या बहिणीचे कर्ज फिटेना” – महेश शिंदे

१९ सप्टेंबर पासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडचा इशारा…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
ग्रामीण कूटा फायनान्शियल सर्व्हिस नावाच्या मॅक्रो फायनान्स कंपनीकडून 2020 टेंभुर्णी मधील अनेक महिलांनी कर्ज घेतले होते. त्याच काळामध्ये अचानक कोरोनाच्या महामारीने लॉकडाऊन जाहीर करण्यात ज्या महिलांना हे कर्ज देण्यात आले त्या महिला आपला छोटा मोठा उद्योग चालू करण्यासाठी ते कर्ज घेण्यात आले परंतु कोरोना सारख्या महामारी मध्ये घरातून बाहेर पडणे सुद्धा अवघड होते.
शासनाने कोरोना काळातील कर्ज धारकांना सक्ती करू नये म्हणून सर्व फायनान्स कंपनीला कळवले परंतु ज्या महिलांनी कर्ज घेतली आहे त्या महिला अशिक्षित आहेत सलग दीड दोन वर्ष घरात बसावे लागले. व्यवसाय करण्याची जराशीही संधी मिळाली नाही.त्यामुळे सर्वच महिला हतबल झाले आहेत.कुटुंब कसे चालवायचे हा यक्षप्रश्न समोर हा अनेक महिलांसमोर पडला आहे.फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता देण्यास विलंब होऊ लागला आहे.
याकडे कंपनी मानवतावादी दृष्टिकोन ठेऊन हप्त्यासंबंधी विचारविनिमय करणे अत्यंत गरजेचे होते, पण कंपनी तसे करत नाही. कंपनीच्या या हुकूमशाहीला महिला कंटाळले आहेत. त्यातून एखादी दुर्दैवी घटना घडू शकते.आज अनेक महिलांची सिबिल खराब झाले आहेत त्यामुळे त्यांना कुठेही कर्ज भेटत नाही या महिला कर्ज भरायला तयार आहेत परंतु ग्रामीण कुटा फायनान्स त्याच्यावर लावलेले चक्री व्याजासहित पैसे जमा करावेत असे शर्त व अटी टाकत आहे. जास्त करून या महिला भटक्या विमुक्त समाजामधील असून दारिद्र रेषेखालील जगणाऱ्यांपैकी या आहेत. जिल्ह्याचे प्रमुख म्हणून आम्ही आपणास विनंती करत आहोत की या घटनेमध्ये जातीने लक्ष द्यावे त्या महिलांचे म्हणणे खालील प्रमाणे मुद्देनुसार मांडत आहोत.
१) ग्रामीण कुटा फायनान्स करून घेतलेले कर्ज चक्री व्याज सोडून आम्ही भरायला तयार आहोत.
२) ग्रामीण कुटा फायनान्स ने मुद्दलेवरील लादलेले व्याज माफ करावे.
३) ग्रामीण कुटा फायनान्स ने पुन्हा फ्रेश लोन द्या व त्यातून ती रक्कम हव्यात कट करून घ्यावी.
४) ग्रामीण कुटा फायनान्सने महिलांचे सिव्हिल खराब केले आहे ते दुरुस्ती करून द्यावे.
वरील सर्व बाबी लक्षात घेता या प्रकरणांमध्ये आपण जातीने लक्ष देऊन पर्याय मार्ग काढून सोडवावा अन्यथा सर्व महिला घेऊन आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण केले जाईल.याची दक्षता घ्यावी.असे निवेदन महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे , जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे, माळशिरस तालुका अध्यक्ष शंकर मस्के, NDMJ चे अविनाश ताकतोडे, सामाजिक कार्यकर्ते विशाल मोहिते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



