महाराष्ट्र

महूद ता. सांगोला येथे शोहदा–ए– कॉन्फरन्स( प्रवचन )चे आयोजन

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.—– 97 30 867 448

महूद ता. सांगोला येथे मासिक ग्यारहवी चे औचित्य साधून व मोहरम महिन्यानिमित्त अहेले सुन्नतवल जमात आणि रजा ग्रुप तसेच नौशाद बाबा मुलाणी( ट्रस्ट मॅनेजर )व माजी ग्रामपंचायत सदस्य समीर शहाजान मुलांनी यांच्या संयुक्त विद्यमाने शोहदा–ए– करबला कॉन्फरन्सचे रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी सायंकाळी 7 ते राञी 10 दरम्यान महुद येथील देवदत्त मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

हजरत मुफ्ती मोहम्मद अख्तर रजा खान (अलय हि रहेमा )व मोहसिने मिल्लत गाजीए दौरा अलाहाज हाफीज फतेह मोहम्मद जोधपुरी (र.अ) यांच्या बफैजे रुहानी (आशीर्वादाने) हा कार्यक्रम संपन्न होणार आहे
या कार्यक्रमाचे मुख्य प्रवचनकार म्हणून हजरत अल्लामा मौलाना अश्शाह सय्यद गुलाम गौस रजवी साहब- पुणे. यांचे बयान( प्रवचन )होणार आहे तसेच नातखाँ म्हणून कारी मुजम्मिल रजा -मिरज जि. सांगली हे नातख्वानी करणार आहेत.हजरत मौलाना मुहिबुल्लाह खान व हाफिज मोहम्मद फिरोज रजा मुजिबी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

शिवाय महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली असून सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले
तरी सांगोला ,माळशिरस, पंढरपूर, तालुक्यातील आणि परिसरातील समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button