भाजपाकडून विधानपरिषदेसाठी पाच नावे जाहीर

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून पाच नावांची सोमवारी (दि.1 जुलै) रोजी घोषणा करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीमध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ.परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाचा समावेश आहे. येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या मतदान होणार असून त्याचदिवशी निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगलाच धक्का बसला होता. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी दिली गेली आहे. तसेच, बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे राज्यातील ओबीसी समाज दुखावला गेलेला असल्यामुळे पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेत संधी दिली असल्याची बोलले जात आहे.



