माळीनगर येथे क्रॉसिंग कट पॉईंट(रस्ता दुभाजक) ची गावकऱ्यांची मागणी अन्यथा जन आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो 99 21 500 780
माळीनगर: माळीनगर गावातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग गेलेला आहे.या महामार्गामुळे गावचे दोन भाग झाल्याने एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र,व स्मशानभूमी,कडे जाताना गावकऱ्यांची गैरसोय होत आहे तसेच श्रीहरीनगर, नंदननगर,खंडाळी ,महाळुंग, श्रीपुर,बोरगाव,या गावांना जोडणारा ग्रामीण मार्ग आहे दोन्ही बाजूला पाच ते सहा हजार लोकसंख्या आहे

त्यामुळे श्रीहरीनगर या ठिकाणी क्रॉसिंग कटपॉईंट (रस्ता दुभाजक)करण्यात यावा यासाठी माळीनगर ग्रामपंचायत ने 22/ 12/ 2023 रोजी मासिक सभेत बहुमताने ठराव मंजूर करून ठरावाच्या प्रती निवेदन गावाच्या वतीने प्रकल्प अधिकारी राज्य मार्ग प्राधिकरण संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग पंढरपूर यांना दिला होते व त्याचा पाठपुरावा देखील वेळोवेळी करण्यात आला,

परंतु प्रकल्प अधिकारी यांनी प्रकरणाची दखल न घेतल्याने उपविभागीय अधिकारी अकलूज यांना ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले मागणी तात्काळ पूर्ण न झाल्यास जन आंदोलनाचा याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला. यावेळी गावचे उपसरपंच अतुल कांबळे, सदस्य अभिजीत वजाळे, चंद्रकांत काळे, महादेव पाटील सर,राहुल रोकडे, विनायक राऊत अतुल कोल्हे,व गावकरी उपस्थित होते.



