महाराष्ट्र

पत्रकारांचे ओळखपत्र हीच त्यांची ओळख – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

कोल्हापूर:पत्रकारांचे ओळखपत्र हीच त्यांची ओळख असून त्यांचे अडवणूक केली जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली

आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल कुसाळ यांच्या बुधवारी झालेल्या स्वागत रॅलीत पत्रकार यांना पोलिसांकडून धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला त्याचा कोल्हापूर प्रेस क्लब ने जाहीर निषेध करत प्रेस क्लब च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बुधवारचा प्रकार कानावर घातला, जिल्हा पोलीस प्रमुख असो की अन्य कोणताही शासकीय अधिकारी व कर्मचारी असो संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

पत्रकारांशी पोलीस प्रशासनाकडून झालेल्या घटनेबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जाहीर माफी मागितली यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, विजय केसरकर, समीर मुजावर, बि.डी.चेचर सुखदेव गिरी, अनिल देशमुख, दीपक घाटगे, पूर्वा दळवी, आधी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button