महाराष्ट्र

अक्कलकोट येथे १८५ वी जागतिक छायाचित्र दिवस साजरा.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अक्कलकोट फोटोग्राफर असोसिएशन कडून जागतिक छायाचित्र दिना निमित्त अक्कलकोट विठ्ठल मंदिर येथे
आयोजित कार्यक्रमात सर्व प्रथम श्री स्वामी समर्थ ,विठ्ठल रुक्मिणी व कॅमेराची पूजन करण्यात आला .

या वेळी जेष्ठ फोटोग्राफर श्री रजनीकांत चव्हाण ,श्री अप्पू रोडगे ,श्री धानप्पा हत्तुरे यांचा सत्कार करण्यात आला .

त्या नंतर अक्कलकोट येथील विठ्ठल मंदिर येथून कॅमेराची पालखीतून ढोल ,बँड बाजा व लातूर येथील भारूढ संघ सह वाजत गाजत विठ्ठल मंदिर ते ए-वन चौक , बस स्थानक , विजयकामगार चौक , कारंजा चौक ,वीर सावरकर चौक, फत्तेसिंह चौक ते विठ्ठल मंदिर अश्या मुख्य रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात आला .

या मिरवणुकीत अक्कलकोट व तालुक्यातील सर्व फोटोग्राफर सह कुंटुंब सहभाग झाले होते.

मिरवणुकी नंतर अक्कलकोट फोटोग्राफर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष-श्री राहुल राठोड ,उपाध्यक्ष-श्री शिवानंद कलशेट्टी , श्री ज्ञानेश्वर भोसले , सचिव -श्री स्वामीनाथ कुंभार ,सहसचिव- श्री प्रवीण मोरे, खजिनदार- श्री अरुणकुमार हत्तुरे, सल्लागार- श्री महांतेश स्वामी या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबू बाजारमठ,नूर पटेल, विजयराज खेडगीकर, किशोर बणजगोळ,मनोज विभुते,नागेश प्रचंडें,गणेश राठोड,ईश्वर नरवडे,
श्रेयश भोसले, राजशेखर हिरेमठ , मल्लिनाथ कलशेट्टी,विजय गायकवाड, सोन्याबापू शिरगापुरे आदीनी परिश्रम घेतले.
सूत्र संचालन बाबू बाजारमठ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button