शहर

कृष्णानंद विद्यामंदिर,पाटीलवस्ती येथील विद्यार्थ्यांनी केला शिक्षक दिन साजरा

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज :- शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती येथे ५ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील इ. १० वी अ आणि ब मधील विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शिक्षक व शिक्षिका यांचे औक्षण करून स्वागत केले त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. १० तील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पेन, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कु अंजली वायदंडे व पांडोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व त्यामधून शिक्षक व त्यांचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. तसेच सहशिक्षक श्री. संतोष अनगळ सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत गुरुवंदन ही कविता सादर केली. विद्यार्थ्यांच्या जीवनातील कर्तव्ये सांगितली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर यांनी विद्यार्थी कसा घडला पाहिजे हे स्पष्ट केले. व इ. १० वी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अभिरुप शिक्षक म्हणून काम पाहिले.

इ. ५ वी ९वी तील विद्यार्थ्यांना अध्यापन केले व एक दिवस शिक्षक होण्याचा मान मिळविला . या दिवशीचे अभिरुप मुख्याध्यापक म्हणून चि. निखिल वगरे याने काम पाहिले व शेवटी मनोगतात सांगितले की, “शिक्षक विद्यार्थ्यांच्या करीता रोज किती कष्ट घेतात हे आज आम्हाला कळाले ” सर्व गुरुजनांचे आभार मानून त्या दिवसाची सांगता केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी काटकर व कु. आरती मदने यांनी केले तर धनश्री लोखंडे हिने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button