शहर

बोईसर परिसरात लहान मुलांना गांजा विक्री करणाऱ्या इसमाला स्थानिक गुन्हे शाखा बोईसर यांनी केले जेर बंद

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात लहान मुलांना गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला बोईसर स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातील 7212 रुपयांचा एकूण मुद्देमाल व एक होंडा होर्नेट गाडी जप्त करून या तरुणाला जेर बंद केले आहे. रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी बोईसर स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलीस बोईसर परिसरात पेट्रोलिंग करत असताना धनेश नारायण स्वामी वय वर्ष (32) राहणार अमृत रेसिडेन्सी बोईसर हा इसम बोईसर परिसरात होंडा होर्नेट या गाडीवर बसून लहान मुलांना खाऊ वाटप करत होता. या इसमाचा पोलिसांना संशय आल्यावर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर, पोलीस हवालदार दीपक राऊत,कैलास पाटील,विजय ठाकूर या पथकाने त्याची अधिक चौकशी करून अंग धडती घेतली असता त्याच्या ताब्यातील 601 ग्रॅम वजनाच्या गांजाच्या पुड्या व शंभर रुपयांच्या 23 नोटा असा एकूण 7212 रुपयांच्या गांजा सह एक होंडा होर्नेट गाडी पोलिसांनी या तरुणांकडून जप्त करून त्याला जेर बंद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button