महाराष्ट्र

तृतीयपंथीयाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये समावेश करा – महाराष्ट्र विकास सेनाअन्यथा राज्यभरात तृतीपंथीयांना बरोबर घेऊन आंदोलन उभा करण्याचा इशारा

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

राज्यातील तृतीयपंथीयांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याची मागणी राज्य सरकारकडे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांना पक्षप्रमुख किरण साठे यांनी त्यांच्या कार्यालयास सदर मागणीचे निवेदन सादर केले आहे.महाराष्ट्र राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली असून त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत.असे निवेदनात म्हटले आहे.

राज्यामध्ये तृतीयपंथीयांची मोठ्या प्रमाणात संख्या असून या तृतीयपंथीयांना हाताला कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्यामुळे ते दररोज कामाच्या शोधामध्ये व उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपले पोट भरण्यासाठी अनेक प्रकारचा फंडा वापरत असल्याचे दिसून येते.त्यामुळे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना चालू केली असल्याने पात्र असलेल्या महिलांना दोन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत.

त्याप्रमाणे राज्यामध्ये असलेल्या तृतीयपंथीयांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये तृतीयपंथीयांचाही समावेश करावा अन्यथा राज्यामध्ये तृतीयपंथीयांना बरोबर घेऊन तीव्र स्वरूपात जन आंदोलन उभा केले जाईल असा इशारा पक्षप्रमुख किरण साठे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button