पालघर जिल्ह्यातील सफाळे चटाळे येथील दुचाकीवरून चौबल सीट जाण्याऱ्या चालकासह (10) वर्षाचा दक्ष गावड अपघातात जागीच ठार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे चटाळे गावातील एक तरुण आपल्या दुचाकी वरून चौबल सीट पालघर दिशेने भरधाव वेगाने जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या कारला त्यांनी जब्बर ठोकर दिल्यामुळे या अपघातात मोटर सायकल स्वार आणि या मोटरसायकल वर बसलेला (10) वर्षीय मुलगा जागीच ठार झाला असून या दुचाकीवर बसलेल्या अन्य दोन महिला जबरी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पालघर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी माहीम मंगल रिसॉर्ट समोर सातपाटी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.सफाळे चटाळे गावात राहणारा तरुण दिनेश नथुराम पाटील त्याच्या MH -05-T-3471 या स्प्लेंडर मोटरसायकलवर दक्ष रमेश गावड वय वर्ष (10), वृषाली रमेश गावड (आई )वय वर्ष (35),व श्रावणी गावड वय वर्ष (15) राहणार नासोपारा या सर्वांना चौबलसीट गाडीवर बसून रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 00.3 वाजता पालघर दिशेला त्यांना पालघर रेल्वे स्टेशन कडे सोडण्यासाठी जात होता.
यावेळी तो माहीम मंगळ रिसॉर्ट समोर रस्त्यावरून जात असताना पालघर दिशेने पांढऱ्या रंगाची MH-48-CT-2703 टाटा पंच कार सफाळे दिशेने येत होती.
यावेळी दिनेश पाटील यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटून त्यांनी या टाटा कारला जोरदार ठोकर दिल्यामुळे या दुचाकी वर बसलेल्या (10) वर्षीय दक्ष गावड याचा जागीच मृत्यू झाला.

तर दिनेश पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला व दक्ष गावची आई वृषाली गावड व श्रावणी गावड या दोन जणी जब्बर जखमी झाल्या असून त्यांना पालघर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत अधिक तपास सातपाटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश जाधव करत आहेत.



