सत्तेच्या सारीपाट जनतेची जन जागृती होणे काळाची गरज आहे…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
भाजपा हा जाती ध्येय धोरणांचे राजकारण करणारा पक्ष म्हणूनच ओळखला जातो,महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका अवघ्या काहीं दिवसाच्या अंतरावरच आल्या आहेत,महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेशी जोडलेल्या पक्षांमध्ये गद्दारी करून पक्ष फोडून सत्ता काबीज करणारा पक्ष म्हणून भाजपाची नाचक्की तर झालीच आहे,त्यामुळेच लोकसभेत जनता हि भाजपा पासून दुर गेलेली आपण पाहिले…
जाती जाती मध्ये विष पेरून भविष्यकाळात दंगली घडवण्याचा प्रयत्न हि केला जाईल,गेली वर्ष भर आरक्षणासाठी रस्त्यावर शांततेचा मार्ग अवलंबत आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाचे ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न हि कऱण्यात येईल…
यामुळेच एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका…
परंतु संविधानाशी बेईमानी करणारा निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने संविधानिक मुल्य आणि संविधानिक नियम पायदळी तुडवून महाराष्ट्र राज्यातील सत्ता पुन्हा एकदा काबीज करु पाहात आहे.ह्या मागे आहे भाजपा चे सत्ता कारण आणि अदानी अंबानी चा पैश्याचे राजकारण…
महाराष्ट्रातील जनतेने वेळीच सावध राहावे आणि महाराष्ट्रातील संविधानिक लोकशाही वरच्या संकटाला ओळखूनच त्या निर्णयावर ठाम रहायला पाहिजे,नाहीतर महाराष्ट्रातील जनतेला सत्तेचा दुरुपयोग करून भूलथापांची भांग पाजण्यात येईल,सत्तेचा दुरुपयोग तात्कालिक योजनांचा गांजा देऊन येथील जनतेच्या मेंदू ला भुल देण्याचा सरकारचा प्रयत्न चालला आहे…
ज्या योजनांचा गाजावाजा केला जात आहे त्या योजनांचा आढावा घ्या ज्या ठिकाणी भाजपाची सरकारे आहेत तिथे ह्या योजनांचा फर्जिवाढा बघा,त्या राज्यात जनतेला फसवून या योजना बंद केल्या आहेत…
विरोधी पक्षांनी आणि संविधान प्रिय लोकांनी जनतेची जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.सरकारचा कावेबाज पणा उघड करून तुम्ही संविधाना प्रती असलेली आपली कर्तव्याची भावना जपा…
संविधानिक लोकशाही ची बुज राखणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहून तुम्ही संविधान वाचविण्याचे कार्य मात्र अवश्य करा.
जय महाराष्ट्र,जय संविधान



