करमाळा गुळसडी रोड वरील पांडे ओढ्यावरील पूल केव्हा बांधणार की सार्वजनिक बांधकाम खाते आणखी किती जणांचे जीव घेणार,माजी सरपंच मानसिंग खंडागळे यांचा संतप्त सवाल

जेऊर प्रतिनिधी
जीवघेणा पांडे ओढ्यावरील पुल केव्हा बांधणार की आणखीन सार्वजनिक बांधकाम खाते किती जणांचे बळी घेणार अशी संतप्त प्रतिक्रिया गुळसडी येथील माजी सरपंच मानसिंग खंडागळे यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले याबाबत त्यांनी करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता यांच्याकडे निवेदन दिले
करमाळा गुलसडी रोडवरील जीवघेणा पांडे ओढा वरील पुल नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी सावंत गटाचे युवा नेते तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुनील बापू सावंत यांच्या उपस्थित मध्ये आज सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता श्री के एस उबाळे हे निवेदन घेण्यास अनु उपस्थित असल्याने त्यांच्या दरवाजावर सदरचे निवेदन चिटकवण्यात आले

निवेदन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपाभियंता कार्यालयात आंदोलन करते आले असता सदरचे संबंधित वरिष्ठ अधिकारी श्री उबाळे साहेब हे गैरहजर असल्याने आंदोलन करते आपला संताप व्यक्त करीत सदरचे निवेदन त्यांच्या दरवाजावर चिटकवले व आपला संताप व्यक्त केला
निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा गुळसडी मार्गावरील पुलावरून रात्रीच्या पावसामध्ये अर्धे पुलाचे बांधकाम वाहून गेलेले आहे गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आम्ही आपल्या कार्यालयाकडे पाठपुरावा करीत आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी एक नागरिक पाण्यात वाहून गेला असून आता आपण अजून किती माणसे पावसाच्या पाण्यात वाहून जायची वाट पाहणार असा संताप त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे व्यक्त केला
सदर पुलाचे काम आठ दिवसात पूर्ण न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार तसेच पुलावर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असे निवेदनाच्या शेवटी आंदोलन आंदोलन करते यांनी म्हटले आहे निवेदनात मानसिंग खंडागळे, सुनील सावंत, अतुल फंड, फारूक जमादार, विनोद महानवर वर तसेच श्रीकांत ढवळे यांच्या सह्या आहेत




