पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या जनसंवाद अभियाना अंतर्गत केळवा सागरी पोलीस ठाणे यांनी राबवलेल्या रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनसंवाद अभियान राबवले जात आहे.
या अभियानाअंतर्गत केळवा सागरी पोलीस ठाणे व रोटरी क्लब केळवा यांच्या सहभागातून गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील शितलाई मंगलधाम हॉल केळवे पश्चिम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील केळवा रोड, उसरणी, दातिवरे,, जलसार, विराथन बुद्रुक टेंभीखोडावे, भादवे, दातिवरे खार्डी,माकुणसार या गावातील अनेक तरुण व महिलांनी मोठ्या प्रमाणात या शिबिरामध्ये सहभाग घेऊन 700 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराला पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, सफाळे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे व केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता. के. शेळके, व केळवा सागरी पोलीस ठाणे अंमलदार तसेच पोलीस व रोटरी क्लब कर्मचारी तसेच या भागातील अनेक सरपंच, सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



