करमाळा येथील नगरपालिका शाळा नंबर 4 मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख
आज 15 ऑगस्ट 2024 रोजी करमाळा नगर परिषदेमध्ये नगरपरिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंगेच्या वेषा मध्ये वेशभूषा करून राष्ट्रगीत ध्वजगीत सादर केले तसेच इयत्ता चौथीतील सज्जन किरण उबाळे व अथर्व दगडे या विद्यार्थ्यांनी संविधान म्हटले तसेच कुमारी विश्वजीत प्रमोद फंड व सज्जन किरण उबाळे यांनी अतिशय उत्कृष्ट असे भाषणे केली
राष्ट्रगीत ध्वजगीत त्याला पेटी तबल्याची साथ श्री मुकुंद मुसळे सर व सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री मुरलीधर अब्दुले सर यांनी दिली तसेच शाळेतील उपशिक्षक श्री संतोष माने सर श्री बाळू दुधे सर व श्रीमती आसराबाई भोसले मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे भाषणाची तयारी करून घेतली या सर्वांना मार्गदर्शन 4 नंबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चंद्रकला सतीश टांगडे यांनी मार्गदर्शन केले नगर परिषदेतील कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला याबद्दल करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब श्री सचिन जी तपसे साहेब माननीय प्रशासन अधिकारी श्री अनिलजी बनसोडे साहेब केंद्र समन्वयक श्री दयानंद चौधरी सर सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा सुरेश माने या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले
या कार्यक्रमांमध्ये ऑर्डर देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशालेचे शिक्षक श्री विक्रम राऊत सर यांनी अतिशय खड्या आवाजामध्ये ऑर्डर देऊन कार्यक्रमाला शोभा आणली तसेच वरिष्ठ लिपिक श्री कोकाटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले करमाळा नगरपरिषदेच्या वतीने सर्व नगरपालिका शिक्षकांना माननीय मुख्याधिकारी साहेब श्री सचिनजी तपसे साहेब यांच्या हस्ते रोप देऊन सत्कार करण्यात आला व वृक्षसंवर्धन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले



