महाराष्ट्र

युवा उद्योजक इम्रान मोहोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून त्यांचा सन्मान

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज : अकलूजचे युवा उद्योजक व A1 पान शॉपचे व्यवस्थापक इम्रानभाई मोहोळकर यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार करत हार्दिक शुभेच्छा दिल्या. दिलदार, मनमिळाऊ स्वभावाने परिचित असलेले इम्रानभाई व्यवसायाबरोबरच मैत्रीचे नाते जपण्यात अग्रेसर आहेत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मोहसीन शेख , टाईम्स ९ न्यूज चे संपादक नौशाद मुलाणी , समीर काझी , याकूब नदाफ , तनवीर मोहोळकर सह विविध सामाजिक, व्यवसायिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

इम्रानभाई यांनी आपल्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून रक्तदान, अन्नदाना सारखे अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या विशेष दिवशी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button