महाराष्ट्र

पोटेगाव बंधाऱ्यासाठी आ.संजय मामांनी निधी आणल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष व सीनारत्न पुरस्कारप्राप्त बापूंनी केले तोंडभरून कौतुक

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख

तालुक्यातील मौजे पोटेगाव येथील सर्वात पहिला कोल्हापूर पध्दती चा बंधारा होय .या बंधाऱ्याच्या कामासाठी वारंवार पेपरमध्ये बातम्यांचा सपाटा लावला होता .मनसेचे तालुका अध्यक्ष श्री संजय बापू घोलप यांनी देखील संगोबा व पोटेगाव च्या बंधाऱ्यांची स्थळ पहाणी केली होती ती अवस्था पाहून त्यांनी देखील हळहळ व्यक्त केली होती .

दुर्लक्षित असणारा संगोबा बंधाऱ्याच्या गळती कडे लक्ष केंद्रित केले होते .त्यामुळे त्यांना सीना परिसराच्या वतीने सीनारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते .तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी अथक प्रयत्न केल्याने हा एवढा मोठा ४कोटी ८ लाख रुपयांचा निधी मिळवला त्यामुळेच मी स्वतः त्यांचे मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया घोलप यांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button