शहर

पालघर जिल्ह्यातील डहाणू सागर नाका सागर मंथन येथे (19) वर्षीय युवकांनी केली गळफास घेऊन आत्महत्या

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील डहाणू सागर नाका जवळ असलेल्या केटी नगर समोरील सागर मंथन बिल्डिंग मध्ये येथे एका (19 )वर्षीय युवकाने दरवाज्याच्या हुकाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.
दीपक प्रेम सिंग वय वर्ष (19) असे या युवकाचे नाव आहे.

तो गेल्या अनेक दिवसापासून पुणे येथे राहत होता. परंतु बुधवार दिनांक 07 ऑगस्ट 2024 रोजी दीपक आपल्या डहाणू येथील राहत्या घरी आला होता.
हा घरातून एका एक गायब झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी त्याचा मृतदेह केटी नगरसमोरील सागर मंथन या बिल्डिंग वरील एका दरवाजाच्या हुकला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेला मृत अवस्थेत आढळून आला आहे.

याबाबत घटनास्थळी डहाणू पोलिसांनी पाहणी करून दीपक याचा मृतदेह शवविच्छेदनेसाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून याबाबत अधिक तपास डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू पोलीस करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button