महावितरण कडून माळीनगर येथील वीज प्रवाह सतत बंद केल्यामुळे परिसरातील उद्योगधंदे विस्कळीत

प्रतिनिधी…. रियाज मुलाणी
मो 99 21 500 780
माळीनगर: माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील परिसरातील गेल्या अनेक महिन्यापासून वीज वितरण कंपनीकडून वीज प्रवाह सतत बंद केला जात आहे त्यामुळे परिसरातील उद्योग व धंदे विस्कळीत झाले आहेत
याबाबत अधिकारी, वायरमन, यांना स्थानिक नागरिकांनी विचारपूस केली असता मेन लाईन पंचर आहे, घोटाळा सापडत नाही, काम चालू आहे ,अशी उडवा उडवी ची उत्तरे दिली जात आहेत अनेक महिन्यापासून दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित केला जाऊ लागला आहे जर खरेच वीजप्रवाह अडचणीत असेल तर फक्त माळीनगर परिसरातच का? माळीनगरच्या आजूबाजूच्या परिसरातही अडचण ना का नाही ?
सागर आदमीले वायरमेन जोपर्यंत माळीनगर हद्दीत काम करत होते तोपर्यंत हद्दीतील नागरिकांना कधीही त्रास झाला नाही मात्र जेव्हापासून नवीन वायरमन या ठिकाणी आले आहेत तेव्हापासून स्थानिक नागरिकांना या त्रासात सामोरे जावे लागत आहे नवीन आलेले वायरमेनचा मनमानी कारभार,बेजबाबदारपणा ,कामाकडे दुर्लक्ष, तक्रारीकडे लक्ष न देणे, नागरिकांचे फोन न उचलणे ,नागरिकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणे ,उर्मटपणा, या सर्व गोष्टींना कटाळून आता स्थानिक नागरिकांना वायरमन व अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन करण्या व्यतिरिक्त पर्याय राहिलेला नाही
तसेच आजूबाजूच्या परिसरातील वीज प्रवाह चालू कसा राहतो शिवांजली सोसायटी, आदर्श सोसायटी, राहुल कॉलनी, येथीलच वीज प्रवाह सतत खंडित कसा होतो?याबाबत सदर अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व सत्य काय आहे ते कळावे असेल नागरिकांतून बोलले जात आहे.



