शहर

अकलूज पोलिसांची दमदार कारवाई…बेकायदेशीररित्या जनावरांचे मास विक्रीसाठी निघालेल्या एर्टिगा वाहनावर गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज : दिनांक 07/08/2024 रोजी 00.45 वा. चे सुमारास पोलीस हवालदार अमोल बकाल व सरकारी वाहनावरील चालक महादेव जाधव असे सरकारी वाहन नं एम एच 13/डी टी 9531 या वाहनाने चेकिंग नाईट राऊंड करीत असताना पोलीस हवालदार अमोल बकाल यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अकलूज शहरातील पंचशिलनगर येथील होनमाने प्लाॅटजवळ जनावरांची कत्तल करून एका पांढरे रंगाचे इरटीगा वाहनामध्ये जनावरांचे मास विक्री करण्यासाठी घेवुन जात असल्याबाबत समजल्याने लागलीच पोलीस हवालदार अमोल बकाल यांनी पोलीस निरीक्षक,भानुदास निंभोरे यांना मिळालेली माहिती कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने पोलीस हवालदार अमोल बकाल, अबकर तांबोळी, इन्नुस आत्तार असे सरकारी वाहनाने सदर ठिकाणी गेले असता, तेथे एक पांढ-या रंगाची इरटीगा गाडी थांबलेली दिसली.

बातमीतील आशयाप्रमाणे संशय आल्याने सदर गाडीकडे जात असताना वाहनाचा चालक अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला. सदर इर्टीगा गाडीजवळ जावुन बॅटरीचे उजेडात पाहीले असता, सदर वाहनाचा आर टी ओ नं. एम एच 04 जी ई 5354 असा होता.

सदर गाडी तपासण्याकरीता गाडीचे दरवाजे उघडले असता उग्र स्वरूपाचा वास आल्याने बॅटरीचे उजेडात गाडीचे पाठीमागील हौदात जनावरांच्या मांसाचे लहान मोठे आकाराचे तुकडे व त्यावर बर्फ टाकलेला दिसला. त्यावेळी अंधार असल्याने सदरचे वाहन व त्यामधील जनावारांचे मांस पुढील कायदेशीर कार्यवाही करने करीता ताब्यात घेवुन वाहन पोलीस ठाणे आवारात आणुन दोन पंचांना पोलीस हवालदार बकाल यांनी बोलावुन घेवून वाहनामधील जनावारांचे मासाचे वजनकाटा धारका मार्फत वजन काट्यावर मोजमाप केले असता
1 50,700/- रू. कि. 338 कि.ग्रॅ. जनावरांचे मांसाचे सुटटे असलेले लहान मोठे आकाराचे तुकडे प्रती किलो किं. अं.150 रू. दराने तसेच

2 3,00,000/- रू.कि.चे एक पांढ-या रंगाची इर्टीगा वाहन त्याचा आर टी ओ नं एम एच 04 जी ई 5354 असा असलेला जु.वा.किं.अ.

     3,50,700 /-  कि.अं. एकुण येणे प्रमाणे 
सदर इरटीगा वाहन क्रमांक एम एच 04 जी ई 5354 चा चालक हा बेकायदेशीररित्या जनावारांची कत्तल करून ते बेकायदेशीररित्या विक्री करणेकरीता घेवून जात असता पोलीसांना चाहुल लागता सदर वाहनाची चावी काढुन पळुन गेल्याने इरटिगा वाहन क्रमांक एम एच 04 जी ई 5354 चा चालक व त्या संबंधी हित संबंध असणा-या इतर अज्ञात लोकांविरूध्द भारतीय न्यायसंहीता कलम 325, 3(5), सह महाराष्ट्र प्राणी संरंक्षण अधिनियम कलम 5(अ), 5(ब), 5(क), 9 अन्वये चालक पोलीस हवालदार महादेव शिवाजी जाधव यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. 

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक षिरीश सरदेषपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, नारायण षिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग, अकलूज, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्षनाखाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस हलवदार अमोल बकाल हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button