मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी सदैव जागृत असणे काळाची गरज- अमोल फुले
अकलूज प्रतिनिधी राहुल गायकवाड
(अकलूज)-येथील सदाशिवराव माने विद्यालय येथे शिक्षक-पालक, माता पालक सभा सभेचे अध्यक्ष मुख्याध्यापक अमोल फुले सर, पालक संघांचे उपाध्यक्ष विशाल जगताप, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष वैशाली पताळे, सदस्य यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी प्रास्ताविक उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य जाकीर सय्यद सर यांनी केले. त्यांनी शिक्षक-पालक, माता पालक संघ स्थापनेचा उद्देश हेतू सांगितला. थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने सभेची सुरुवात झाली.
याप्रसंगी नूतन शिक्षक-पालक, माता -पालक संघाची स्थापना इच्छुक पालकांमधून करण्यात आली. शिक्षक पालक संघांचे नवनियुक्त उपाध्यक्ष म्हणून डॉ. अमोल माने तर माता पालक संघाच्या गायत्री शेटे यांची निवड करण्यात आली. संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांचा सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर विद्यालयात शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षा, सारथी शिष्यवृत्ती, संगीत विशारद परीक्षा यांची माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी दिली तसेच दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल वाचन परीक्षा प्रमुखांनी केले.
सदर सभेत अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्याध्यापक फुले सर यांनी विविध शालेय- सहशालेय उपक्रम, संस्थेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धा, संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय लेझीम स्पर्धा, शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम, शालेय शिस्त, गुणवत्ता, व्यवस्थापन, परीक्षा पद्धती, गतवर्षी विद्यालयाला मिळालेले पुरस्कार याची माहिती सांगितली तसेच पालकांना संबोधताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भवितव्यासाठी पालकांनी सदैव जागृत असणे त्यांना नेहमी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शिक्षणासोबत संस्कार सुद्धा आवश्यक असल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना घरी शिक्षणासोबत शिस्त व संस्कार सुद्धा द्यावेत. पाल्यास मोबाईलच्या मोहापासून व प्रसार माध्यमांपासून दूर ठेवणे गरजचे असल्याचे सांगितले.
यासभेप्रसंगी पत्रकार शशिकांत कडबाने,टाईम्स 9 मराठी न्युज चे संपादक नौशाद मुलाणी, पत्रकार शरद भोसले, विद्यालयाचे व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य भारत शिंदे, विज्ञान प्रमुख असिफ झारेकरी, पर्यवेक्षक धनंजय मगर, उमेश बोरावके, शिक्षक प्रतिनिधी संजय जाधव, राजाराम काळे बहुसंख्य पालक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार असिफ झारेकरी यांनी मानले.