पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची नीरा नरसिंहपूर येथील नवीन पोलीस स्टेशनला भेट

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123
तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बांधून पूर्ण झालेल्या नवीन पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीची पाहणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सहकाऱ्यांसमवेत केली.
नीरा नरसिंहपूर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बांधण्यात आलेल्या १ कोटी ३३ लाख रूपयांच्या पोलीस स्टेशन व १ कोटी ३२ लाख रूपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीची पाहणी व माणकेश्वरवाडा येथील भक्त निवासाची पाहणी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केली. यावेळी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, हवालदार जगन्नाथ कळसाईत, पोलीस गायकवाड, सागर काकडे, नाराजी सुरू, विजय सरवदे, प्रभाकर जगताप आदि उपस्थित होते.

नीरा नरसिंहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दी अंतर्गत येणाऱ्या गावे, त्यातील लोकसंख्या तसेच संवेदनशील व अतिसंवेदनशील गावे यांची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार व नागनाथ पाटील यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना दिली.
दरम्यान तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भेटून पुजा व प्रार्थना केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तर प्रसाद दंडवते यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना श्रीफळ देवून मंदिराचा पौराणिक ऐतिहासिक महात्माजी माहिती दिली. येथे येणाऱ्या भक्तांसाठी असणाऱ्या सुख सोयींचे तसेच त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे का याची चौकशी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केली.



