शहर
अकलुज च्या जुलेखा पठाण ने मिळवले उज्वल यश…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलुज येथील जुलेखा बाबुलाल पठाण याची जल संपदा (पुणे विभाग परीमंडळ) येथे सहाय्यक स्थापत्य अभियंतापदी निवड झाली आहे.
जलसंपदा विभागाच्या वतीने 31 डिसेंबर 2023 रोजी सहा.स्थापत्य अभियंता पदासाठी “सरळ सेवा भरती” द्वारे परीक्षा घेण्यात आली होती.सदर परीक्षेचा निकाल 31 जुलै 2024रोजी जाहीर झाला.त्यामध्ये अकलुजची कन्या कु.जुलेखा बाबुलाल पठाण यांनी यशश्री खेचुन आणली…

जुलेखा पठाण या अकलुज येथील सदुभाऊ चौकातील कोमी झेरॉक्स सेंटर चे बाबुलाल पठाण यांच्या कन्या असुन तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातुन तिच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…
बाबुलाल पठाण यांच्या कन्ये ने यश संपादन केल्यामुळे अकलूज च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला असल्याचे मत अकलूज येथील नागरिकांनी व्यक्त केले…



