महाराष्ट्र

आ.रोहीत पवार यांनी खा.डाॅ.अमोल कोल्हे,खा.निलेश लंके व खा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा केला नागरी सत्कार.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

कर्जत जामखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार रोहीत पवार यांनी लोकहिताचे विकासकामे जनसामान्यांपर्यंत पोहचवली आहे त्यांनी कर्जत जामखेड तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे. आ.रोहीत पवार तालुक्यात विकासाचा दृष्टिकोन ठेऊन काम करत आहेत. कर्जत जामखेड तालुक्यातील जनता पुन्हा एकदा आ.रोहीत पवार यांना सभागृहात पाठवेल यात शंका नाही असे कार्यक्रमाप्रसंगी खा.धैर्यशिल मोहिते-पाटील म्हणाले.

यावेळेस आ.रोहीत पवार यांच्या प्रयत्नातून झालेल्या कर्जत तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप महासोहळा खा.धैर्यशिल मोहिते-पाटील व नुतन खासदार,आमदार रोहीत पवार यांचे शुभहस्ते मिरजगाव ता.कर्जत जि.अहमदनगर येथे संपन्न झाले.

यावेळी,मा.आ.नारायण आबा पाटील,मा.आ.साहेबराव नाना दरेकर,बाळासाहेब साळुंखे संचालक जिल्हा बँक,दघु आबा काळदाते जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,विजयसिंह गोलेकर ता.अध्यक्ष राष्ट्रवादी,संतोष वारे ता.अध्यक्ष राष्ट्रवादी करमाळा,संग्राम पाटील व गुलाबकाका तनपुर संचालक बाजार समिती, काँग्रेस,राजश्रीताई मोरे, ता.अध्यक्ष जामखेड महिला राष्ट्रवादी काँग्रेस,पुजाताई सुर्यवंशी ता.अध्यक्ष कर्जत महिला राष्ट्रवादी काँग्रेस व विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी मान्यवर व पत्रकार बंधु उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button