अकलूज पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल

प्रतिनिधी रियाज मुलाणी
माळशिरस तालुक्यातील माळेवाडी अकलुज येथील अजीत चंद्रकांत चंदनकर रा. आलेगाव ता. माढा सध्या रा. माळेवाडी, अकलुज ता. माळशिरस जि.सोलापूर हे अकॅडमी मध्ये मुला/मुलींचे पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण घेतात.यातील पिडीत मुलगी सदर ठिकाणी प्रषिक्षणाचा सराव करत असताना दिनांक २६/०१/२०२४ ते दिनांक २७/०७/२०२४ रोजी पर्यंत गेली सात महिने पर्यंत सतत पिडीत मुलगी ही हिंदु-महार समाजाची आहे हे माहीत असताना देखील अजीत चंदनकर (आरोपीने) ‘‘तु मला खुप आवडतेस,तु माझेशी बोलत जा, तुमचे समाजातील ब-याच मुली माझे सोबत बोलत आहेत, तु पण माझे सोबत बोलत जा, तुला माझे जवळ शरीराने,मनाने यायला आवडेल’’असे म्हणुन पिडीत मुुलीचे डावे हातास धरुन मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन सदरचा प्रकार ‘‘तु कोणास सांगीतला तर,तुझी वाट लावीन’’ असे म्हणुन शिवीगाळी करुन दमदाटी केली म्हणून मजकुरची तक्रार दिल्याने अकलुज पोलीस ठाणेस भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७५, ३५२, ३५१(२), ३५१(३) सह अनुसुचीत जाती आणि अनुसूचित जमाती (अत्यचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९चे कलम ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii), ३(२)(va) अन्वये दाखल आहे. सदर गुन्हयातील आरोपीस अटक करण्यात आली असून एक दिवस पोलीस कस्टडी (रिमांड )मिळाली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्षनाखाली सदर गुन्हयाचा तपास नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग,अकलूज हे करीत आहेत.



