महाराष्ट्र

अकलूज च्या बादशहा शेख यांना नॅशनल एक्सेलन्सी पुरस्कार प्रदान…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

🎯नवी दिल्ली येथे उत्तराखंड चे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान…

आज नवी दिल्ली येथे नॅशनल,एक्सेलन्सी अवॉर्ड बादशहा रहिमतुल्ला शेख यांना प्रदान करताना उत्तराखंड चे मुख्यमंत्री ना श्री तीरथ सिंग रावत व अन्य मान्यवर होते…

दर वर्षी दिल्ली येथील गॅलक्सी सामाजिक संस्थेच्या वतीने भारत देशा मधील वीस सामाजिक कार्यकर्ते यांना हा पुरस्कार देण्यात येतो…

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातून अकलूज येथील सामाजिक चळवळीत कार्य करणारे बादशाह रहीमतुल्ला शेख यांच्या नावाची सदर संस्थेने निवड केली होती,त्या नुसार बादशहा शेख यांनी दिल्ली येथे जाऊन हा पुरस्कार स्वीकारला आहे अशी माहिती टाइम्स 9 ला त्यांनी भ्रमणध्वनी वरून बोलताना दिली…

बादशहा शेख यांना हा पुरस्कार मिळाल्याने समाज घटकातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे,बादशहा शेख यांचे अकलूज च्या मुस्लिम चळवळीतील योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button