माळशिरस येळीव काळा मारुती येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस संपविले

टाईम्स 9 मराठी प्रतिनिधी: महेश मोहिते.मो नंबर.9307125598
माळशिरस . येळीव (ता. माळशिरस ) येथे चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करून तिचा गळा आवळल्याने खून झाल्याबाबतची फिर्याद मयताच्या मुलाने माळशिरस पोलिसात दिली आहे . या बाबत आरोपी ला माळशिरस पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीस चार आक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी महादेव नवगिरे याची पहिली पत्नी मयत असून आशाबाई निळे या महिलेचा पहिला पती ही मयत आहे आरोपी महादेव नवगिरे व मयत आशाबाई निळे या दुसऱ्या पत्नीसोबत येळीव काळा मारुती येथे राहत होता .आरोपी महादेव नवगिरे हा चारित्र्याच्या संशयावरून सतत आशाबाई निळे हीस मारहाण करत असे सोमवारी रात्री चारित्र्याच्या संशयावरून या दोघांमध्ये वाद झाला व महादेव नवगिरे याने आशाबाई निळे हि ला मारहान करून गळा दाबुन खून केला या प्रकरणी आशाबाई निळे हिचा मुलगा सहदेव निळे याने माळशिरस पोलिसात आरोपी महादेव नवगिरे विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आशाबाई निळे हिच्या खून प्रकरणी महादेव नवगिरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. असता पत्नी वर संशय असणारा संशयित निंबाळकर व मयत आशाबाई हिचा सिडीआर काढुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जानकर तपास करत आहेत.



