शहर

डॉ.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती प्रतिभा पाटील यांना निलंबित करण्यात यावे – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी

मुंबई प्रतिनिधी विजय घरत.

महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फेब्रुवारी- मार्च 2023 या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई कांदिवली येथील डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती प्रतिभा पाटील यांना तातडीने निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुंबई दहिसर येथील शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांच्यामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश असे भाजपचे बॅनर लावण्यावरून वाद निर्माण होऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी विभीषण वारे यांना जबरी मारहाण करून जखमी केले होते

या मारहाणीत विभीषण वारे पूर्णपणे जखमी होऊन त्यांच्या अंगावर वार झाले असताना देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली येथील डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी)रुग्णालयाच्या डॉक्टरांनी विभीषण वारे यांना ऍडमिट न करता त्यांच्यावर कुठलेही उपचार केले नाही अशा हलगर्जीपणा करणाऱ्या या हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती प्रतिभा पाटील यांना निलंबित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button