कसबे पाटस च्या अवंतिका शितोळे यांचा नालंदा ऑर्गनायझेशन,पुणे यांच्या वतीने सन्मान…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
कसबे पाटस च्या अवंतिका शितोळे यांना यंदाचा नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला,नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार सोहळा 2024,हा दिमाखदार सोहळा 27 जूलै रोजी पत्रकार भवन,नवी पेठ,पुणे येथे मोठया उत्साहात पार पडला.
या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मधून आदर्श काम करणाऱ्या 35 ग्रामपंचायतींना निमंत्रण देण्यात आले होते.गाव पातळीवर काम करणाऱ्या सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,तसेच ग्रामपंचायतींना सहाय्य करणारे मुख्याध्यापक यांना प्रतिनिधी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते…

नालंदा ऑर्गनायझेशन हि संस्था 2021-22 सालापासून गाव पातळीवर सर्वेक्षण करून संबंधित पुरस्कारासाठी निवड करत असते.सर्वेक्षणा दरम्यान प्रत्येकाचे गावासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात येते….
Covid काळामध्ये किंवा Covid-19 चा काळ संपल्यानंतर ज्या सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील आणि शाळा मुख्याध्यापकांनी गावांच्या उभारणी करिता त्याचबरोबर ग्रामसमृद्धी करिता शाश्वत उपाय योजना राबवण्यासाठी मदत केली आहे,अशा सन्माननीय व्यक्तींची या सोहळ्यासाठी निवड करण्यात येत असते…
ह्या कार्यक्रमाला उपस्थित सन्मानार्थींना भारतीय परंपरेप्रमाणे फेटा बांधून तसेच औक्षण करून स्वागत करण्यात येते…

सोहळ्याच्या माध्यमातून ग्रामसमृद्धीसाठी एकमत असलेल्या अनेकांना एकत्र करून विचारांची देवाण-घेवाण व्हावी,त्याचबरोबर त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे म्हणून छोटासा सन्मान करण्याची संधी या माध्यमातून संस्थेला मिळते अशी माहिती संस्थेचे कार्यक्रम अधिकारी श्रीकांत जायभाय यांनी व्यक्त केली…

नालंदा ऑर्गनायझेशन चा राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार अवंतिका शितोळे यांनी पटकवल्याने कसबे पाटस येथील जनतेने आनंद व्यक्त केला…



