राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिर

प्रतिनिधी…. रियाज मुलाणी
मो.99 21 500 780
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुका व अकलूज शहर आणि शिव आरोग्य सेना यांचे वतीने अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिराचे तसेच कोलारी मेथड पद्धतीचे मसाज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि ३४७ लोकांनी मसाज शिबिराचा लाभ घेतला
तालुका प्रमुख संतोष(भैय्या) राऊत, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख उमेश जाधव, अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे,शिव आरोग्य सेना तालुका समन्वयक संजय गुंड, समन्वयक दिपक बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले,

माळशिरस तालुक्याचे धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर, अकलूज गावचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटिल, विकास सोसायटी चे चेअरमन नितीनराजे निंबाळकर, यांनी या शिबिरास विशेष उपस्थिती लावली

युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सोनु पराडे पाटील,शिवसेना माळशिरस तालुका उपप्रमुख निलेश कांबळे, मार्गदर्शक जेष्ठ शिव सैनिक पि व्ही कुलकर्णी, माळीनगर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण डोईफोडे, पै गोरख पवार नागनाथ मगर, सचिन कदम ,मैत्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) पदाधिकारी मोहसीन शेख, महाराष्ट्र कामगार सेनेचे अकलूज आगार प्रमुख बाळासाहेब सुर्यवंशी, विभाग प्रमुख दत्तात्रय काशिद,गटप्रमुख मिलिंद मोरे, गटप्रमुख रज्जाक मुलाणी,वेळापुर शहरप्रमुख आप्पा कांबळे,श्रीपुर शहरप्रमुख प्रविण शिंदे,विवेक देशमाने, सुरेश पाटील, शाखाप्रमुख गणेश काळे, लालासाहेब अडगळे, रणजित भोसले, उत्कर्ष शेटे, माळी साहेब, अमोल पनासे, अविनाश सोनवणे सागर जगदाळे, गोरख गोरड, जावेद बाबा शेख, नंदकुमार कांबळे, विद्याताई साळुंखे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.




