कृषी दिनानिमित्त करमाळा येथील विजय ऍग्रो चे व्यवस्थापक वृषभ गादिया यांचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार देऊन सत्कार संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा शहरातील विजय ऍग्रो चे व्यवस्थापक गादिया यांचा आज कृषी दिनानिमित्त करमाळा येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये उत्कृष्ट सेवाधारक म्हणून आज कृषी दिनाच्या निमित्ताने यथोचित सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला
सदरचा पुरस्कार करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे व करमाळा तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या हस्ते तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी संभाजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज देण्यात आला त्यानिमित्ताने आज त्यांचा शेतकऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक नामदेव मुरूमकर यांच्या हस्ते वृषभ गादिया यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रगतशील बागायतदार आजिनाथ नलावडे, संजय पाटील, मनोहर कोंढारे, सोमनाथ वायकुळे, स्नेहा परदेशी, माधुरी आवटे, चंद्रकांत गरड, नितीन घोडेगावकर, शहाजी महाडिक, सुहास ओहोळ जीवन होगले आदि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

विजय ऍग्रो चे व्यवस्थापक श्री वृषभ गादिया यांनी आजपर्यंत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट अशी विना तक्रार सेवा पुरवली त्यांच्या या उत्कृष्ट सेवा प्रणाली बद्दल आज कृषी दिनानिमित्त त्यांचा महसूल प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

सदरचा माझा झालेला सन्मान हा मी केलेल्या आज पर्यंतच्या प्रामाणिक व स्वच्छ कारभारामुळे मला हे प्रशस्तीपत्रक करमाळा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची अखंडपणे सेवा केल्याने मिळाले असून यापुढेही मी असेच स्वच्छ व प्रामाणिक कार्य करीत राहणार आहे
वृषभ गादिया
व्यवस्थापक विजय ऍग्रो एजन्सी
करमाळा



