महागांव कृषी उत्पन्न बाजार समितीत बैलबाजार सुरु करणे काळाची गरज..शेतकरी अमोल सुभाषराव शिंदे

प्रतिनिधी:-मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
शेतकऱ्यांच्या हिताची संस्था म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती,नव्यानेच बाजार समितीची निवडणूक झाली यात शेतकरी,हमाल,मापारी,व व्यापारी हितचिंतक संचालक निवडून आले.या नवनिर्वाचीत संचालकांनी नवा उपक्रम राबवून नव्यानेच बाजार समिती तीत बैल बाजार सुरु करावा असी मागणी शेतकरी आणि पशुधन पालक वर्गातून जोर धरत आहे.
मागील अनेक वर्षापासून उमरखेड,पुसद,डिग्रस,मांडवी येथे गुरांचा बाजार भरतो,तालुक्यातील पशुधन पालकांना चाळीस ते पन्नास कि. मी.अंतर पार करुन भाडोत्री वाहनाने पशु विक्री करावी लागते. त्यामुळे पशुधन पालकांचा वेळ आणि पैसा बरबाद होत असुन मानसिक त्रासास समोर जावे लागत आहे.

महागांव शहरात पशुधनाचा बाजार सुरू केला तर दुधदुभती,भाकड,गाय,बैल,म्हैस,शेळ्या,मेंढ्या व अन्य पशुधन विक्रीसाठी येतील यामुळे बाजार समिती गजबजलेली असेल आणि बाजार समितीच्या मिळकतीत वाढ सुध्दा होईल.पशुधनाची खरेदी विक्रीतून बऱ्याच मजुरांना रोजगार उपलब्ध होईल,शहराचा व्यापार वाढेल.तर तालुक्यातील हजारो शेतकरी व पशुधन मालकास सोयीस्कर होऊन राजकीय ओळख निर्माण होईल.
नवनिर्वाचित संचालकांनी व्यापाऱ्यांसी मनोमिलन करून बाजार समितीत बैलबाजार भरवावा अशी शेतकरी अमोल सुभाषराव शिंदे यांनी आमचे प्रतिनिधीस चर्चेतून माफक विच्छा प्रगट केली आहे.



