महाराष्ट्र

समृद्धी प्रमाणे भाव मिळावा यासाठी ग्रीन फील्ड संघर्ष समितीचा रास्ता रोको आंदोलन–पुढील आंदोलन मुंबई आझाद मैदान येथे होणार

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अक्कलकोट -सोलापूर जिल्ह्यातील सुरत चेन्नई महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना समृद्धी प्रमाणे भाव मिळावा यासाठी अक्कलकोट जवळील सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

ग्रीन फील्ड संघर्ष समितीच्या वतीने या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये अक्कलकोट,दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर, कासेगाव,तुळजापूर,बार्शी येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळासाहेब मोरे आणि स्वामीनाथ हरवाळकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.सुरत चेन्नई हरित महामार्गासाठी अत्यल्प मावेजा देऊन शासनाने पाच जिल्ह्यातील शेतकरी संपवण्याचा डाव आखला आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी आज प्रचंड संख्येने उपस्थित राहून रोष प्रकट केला.

यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,नगरसेवक महेश हिंडोळे,आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, रासपचे सुनील बंडगर,शिवसेनेचे आनंद बुक्कांनुरे,सुरेखा होळीकट्टी यांनी मार्गदर्शन केले.आंदोलनात वीरेश भंगरगी, विश्वनाथ भरमशेट्टी, प्रिया बसवंती, प्रियंका दोड्याळे, चंद्रशेखर मडीखांबे,सिद्धू भंडारकवठे, कालिदास वळसंगे,सिद्धार्थ गायकवाड,सुभाष शिंदे, दत्ता माडकर,चिदानंद उन्नद यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्याचे या आंदोलनात ठरले.अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना निवेदनाचे प्रत देण्यात आले.उत्तरचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि दक्षिणचे महेश स्वामी यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button