दिंडीतील मानकऱ्यांचे हस्ते ॲड वजीर शेख यांचा सन्मान…

गेली सतरा वर्षे ॲड वजीर शेख करतायेत दिंडी ची मनोभावे सेवा…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम इंदापूर तालुक्यातील सराटी येथे पार पडल्यानंतर काल निरा नदी येथे पादुका स्नान करून सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे प्रवेश झाला होता…

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या सह अनेक संतांच्या पालख्या हि अकलूज मुक्कामी दाखल झाल्या होत्या,तत्पूर्वी सांगुर्डी (देहू) येथील कडजाई माता प्रासंगिक दिंडीचे आगमन हि अकलूज नगरीत झाले होते…

गेली सतरा वर्षे हि दिंडी अकलूज शंकरनगर रोड येथे माळशिरस तालुक्यातील मुस्लिम समाजाचे नेते ॲड वजीर शेख यांच्या निवासस्थानी मुक्कामी असते,या दिंडीचे गेल्या सतरा वर्षापासून ॲड वजीर शेख हे मनोभावे सेवा बजावत असुन दिंडीतील समस्त वारकरी संप्रदायांना जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली जाते…

आज अकलूज मुक्कामी सदरची दिंडी असल्याने शेख परिवाराच्या वतीने दिंडीतील समस्त भाविकांच्या जेवणाची पंगत केली गेली,या वेळी दिंडीच्या मानकरी यांचे वतीने ॲड वजीर शेख यांचा सन्मान करण्यात आला,या वेळी दिंडीतील भाविक भक्त उपस्थित होते…



