महाराष्ट्र
पालघर जिल्ह्यातील केळवा रोड येथे मनसे रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक तथा अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पालघर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन केळवा रोड येथील रिक्षा चालक-मालक यांनी शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी मनसे युनियन मध्ये प्रवेश केला.
यावेळी केळवा रोड येथे मनसे नवीन रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष विनोद मोरे, पालघर जिल्हा सचिव दिनेश गवई, पालघर तालुका तथा विलंगी गावचे उपसरपंच चेतन पाटील, पालघर तालुका अध्यक्ष तथा केळवे सरपंच संदीप किणी, उदय अधिकारी, शाखा अध्यक्ष जयकांत घरत,अक्षय राऊत, सुनील पाटील, संदीप म्हात्रे तसेच रिक्षा चालक-मालक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



