डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त “भीमरत्न सन्मान पुरस्कार “सोहळ्याचे आयोजन

टाइम्स 9 मराठी न्यूज
विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त “भीमरत्न युवा मंच “समतानगर – अकलूज यांच्या वतीने आरोग्य, पत्रकारिता, शैक्षणिक ,समाजिक , ग्रामविकास, आदी क्षेञामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा आदर्श पालक ,आदर्श शिक्षक ,आदर्श आरोग्य सेविका, आदर्श पत्रकार, अशा व इतर समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा दि.14 ” एप्रिल 2023 रोजी “भीमरत्न सन्मान पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास अकलूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव अकलूज नगर परिषदेचे प्रभारी अधीक्षक सुनील काशीद कर निरीक्षक बाळासाहेब वाईकर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप संपन्न होणार असून

शाल,श्रीफळ सन्मानपञ, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरुप आसल्याची माहिती ‘भिमरत्न युवा मंच ‘चे अध्यक्ष प्रेम नवगिरे व उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी दिली असुन या बाबत ” टाइम्स 9 मराठी न्युज चॕनेल “चे विशेष सहकार्य लाभले आहे.



