अकलूज येथे ओरॅकल आंतरशालेय स्पर्धेत १५८ विद्यार्थ्यांचा सहभाग.

अकलूज (प्रतिनिधी) केदार लोहकरे
धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज संचलित धनशैल्य विद्यालय गिरझणी व किडझी अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने ओरॅकल आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल संग्रामनगर अकलूज येथे करण्यात आले.हे या स्पर्धेचे ५ वे वर्ष आहे.

या स्पर्धेत वय वर्ष २ ते १४ वयोगटातील विविध शाळांमधील तब्बल १५८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रेवती राणे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अर्चना गवळी उपस्थित होत्या.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून किशोर शिंदे,लक्ष्मण धोत्रे,प्रताप थोरात,औदुंबर भिसे व सौ.वैष्णवी खरटमल यांचे विशेष सहकार्य लाभले.विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला गौरवपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील सादरीकरणे पाहून पालक व उपस्थितांनी उत्साहाने दाद दिली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.रेवती राणे यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना मोबाईल-टीव्हीच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात.असे सांगितले.या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. अर्चना गवळी यांनी विद्यार्थ्यांच्या टीम स्पिरिट व कलागुणांची प्रशंसा करत अशा स्पर्धा वारंवार आयोजित करण्याची गरज व्यक्त केली.तर संस्थेचे अध्यक्ष मनीष गायकवाड यांनी अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकता व कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळते.असे मत व्यक्त केले.

हा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने परिश्रम घेतले.पालकांनी ही या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.



