पालघर जिल्ह्यातील सफाळे विटी लाईन माकणे रस्त्यावर अपघाताच्या संख्येत वाढ

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516650
सफाळे माकणे विटी लाईन मेन या रस्त्यावर सध्या अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज-रोज पणे रोज या रस्त्यावर अपघात होऊन प्रवासी व वाहतूक दारांना आपला जीव गमवावा लागत आहे.
टेंभीखोडावे ते माकणे सफाळे या विटी लाईन वरील नऊ किलोमीटरच्या या रस्त्यावर सध्या जड मालवाहू वाहनांची दिवस-रात्र वाहतूक चालू असल्या कारणामुळे माकणे आणि टेंभीखोडावे येथील पुराचे पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेले छोटे पूल तुटण्याच्या मार्गावर आले आले असून या छोट्या पूलांची दैनिय अवस्था झालीआहे

जड वाहनांच्या या मालवाहू वाहतुकीमुळे मेन रस्त्यावर पडलेले खड्डे व भर रस्त्यात पडलेल्या माती आणि खडीमुळे अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ आहे.
ही सर्व जड वाहतूक करणारी वाहने माकणे आणि नूतन नगर या परिसरात मेन रस्त्यावर तासन तास उभी राहत असल्यामुळे या रस्त्याने वाहतूकदारांना व प्रवाशांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या कारणामुळे या रस्त्यावर सध्या अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून या मेन रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी व जड वाहनांची मालवाहू वाहतूक करणाऱ्या मनमानी वाहतूकदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विटी लाईन या मेन रस्त्यावर पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी या भागातील स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



