शहर

पालघर जिल्ह्यातील विराथन बुद्रुक,जलसार येथील बाधित घरमालक नुकसान भरपाई पासून वंचित…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

पालघर जिल्ह्यातील विराथन बुद्रुक, जलसार हद्दीत बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीसाठी एल अँड टी कंपनी मार्फत केल्या जाणाऱ्या भुसुरुंग अति क्षमतेच्या स्फोटामुळे या हद्दीतील शेकडो घरांना भेगा जाऊन या घरांची दयनीय अवस्था झाली आहे.

यामुळे घरमालक हैराण झाले असून याबाबत स्थानिक नागरिकांनी आपल्या हद्दीतील ग्रामपंचायती मध्ये बुलेट ट्रेन आणि एल अँड टी कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधी तक्रारी दाखल केल्यावर या घरांचे तात्पुरते सर्वे करून नुकसान भरपाई दिली जाईल असे बुलेट ट्रेन व एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खोटी आश्वासने देऊन या बाधित घर मालकांची फसवणूक केली जात आहे.

गेल्या वर्षभरात बाधित घरांचा तीन वेळा दिल्ली येथील खाजगी कंपनीकडून सर्वे करून देखील या बाधित घरमालकांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे अखेर माजी जिल्हा परिषद सदस्य दामोदर पाटील, टेंभीखोडावे ग्रामपंचायतीचे उपसरपंच धणेश गावड, जलसार ग्रामपंचायत उपसरपंच विंकोश म्हात्रे यांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन बाधित घरमालकांच्या घरांचा रिसर्वे करून योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button