महाराष्ट्र

पंढरपुर तालुक्यातील मौजे मेंढापुर येथे औ‌द्योगिक वसाहत मंजूर करावी आ.रणजितसिंह व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पंढरपुर तालुक्यातील मौजे मेंढापुर येथे शासकीय मालकीच्या ३२२ एकर उपलब्द जागेवर औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या संदर्भात आज मुंबई विधान भवन येथे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांची आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली व तसे पत्र दिल्याची माहिती माढा तालुक्याचे भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी भ्रमणध्वनी वरून बोलताना सांगितले…

सन २०११ चे जनगणनेनुसार पंढरपुर तालुक्याची लोकसंख्या सुमारे ४.४२,३६८ इतकी असून सद्यस्थितीत पंढरपुर शहर व ग्रामीण भागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसेच पंढरपुर तालुक्यालगतच मोहोळ व माढा तालुका असुन या सर्व भागातील सुशिक्षीत व कार्यकुशल बेरोजगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येथील नव उ‌द्योजकांना संधी उपलब्द करुन देण्याच्या दृष्टीने ग्रामीण विकासाच्या राज्य शासनाच्या धोरणास अनुकुल सूक्ष्म, लघु व मध्यम उ‌द्योगांना प्रोत्साहन देणे. रोजगार निर्मिती करणे आणि प्रादेशिकदृष्ट्या संतुलित, पर्यावरणदृष्ट्या शाश्वत व सर्वसमावेशक औ‌द्योगिक वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने येथे औ‌द्योगिक वसाहत (MIDC) होणे अत्यंत गरजेचे आहे.

त्या दृष्टीने पंढरपुर तालुक्यातील मेंढापुर येथे (गट नं १२९(१७८३) १५ हे.५२ आर गट नं १३३(१७६९)-१७ हे.९२आर), (गट नं १४७ (१७७२) १६ हे.८३ आर), गट नं १४९(१७८१)-१६ हे.८३ आर (गट नं१५०(१७८२)-२१हे.९७ आर) गट नं १५१.१७ हे. ६२ आर. गट नं १५९.२२ हे. १४ आर असे १२८ हेक्टर ८३ आर (३२२ एकर) शासकीय मालकीची जमीन उपलब्द आहे. सदर जमीनीची मालकी महाराष्ट्र शासनाकडेच असलेने इतर शेतक-यांची जमीन संपादित करावी लागणार नाही. तसेच या भागाच्या औ‌द्योगिक विकासासाठी पोषक पायाभूत सुविधा म्हणुन पालखी मार्गासहीत पंढरपुरला जोडणार्या महामार्गाचे जाळे. त्यामुळे निर्माण झालेली दळणवळणाची सुलभता, तसेच भिमा डावा कालवा व चंद्रभागा नदीतुन सहज उपलब्द होणारे पाणी व विजेची सुलभ वितरण प्रणाली या पायाभुत सुविधाची कुठलीही कमतरता भासणार नाही.

पंढरपुर तालुक्यासह मोहोळ व माढा तालुक्यातील औ‌द्योगिक विकासाला चालना देऊन रोजगार निर्मितीबरोबर सर्वसमावेशक विकासाची गती वाढवण्यासाठी सदरची शासकीय जमीन औ‌द्योगिक वसाहतीला (MIDC) मिळुन मौजे मेंढापुर ता पंढरपुर येथे औ‌द्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्यासंदर्भात आ.रणजितसिंह व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांना विनंती केली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button