ॲड.निलेश राऊत यांची अपंग कल्याणकारी संस्थेच्या सल्लागार पदी निवड.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
पालघर तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते ॲड.निलेश राऊत यांची अपंग कल्याणकारी संस्थेच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यरत असलेली अपंग कल्याणकारी संस्था मागील १९ वर्ष पालघर,वसई,डहाणू,विक्रमगड , जव्हार अश्या ठिकाणी कार्यरत आहे.अनेक ठिकाणी अपंगांचे मेळावे आयोजित करणे विविध शासकीय योजनांचे अनुदान लाभ मिळवून देणे असे उपक्रम राबविले जातात.
ॲड.निलेश राऊत गेली २४ वर्ष सामाजिक कार्यकर्ते म्हणून पालघर तालुक्यासह जिल्हा मद्ये कार्यरत आहेत.ते सध्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पालघर जिल्हा प्रमुख म्हणून देखील काम करीत आहेत.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच गरीब गरजूंना मदत,वैद्यकीय मेळावे ऍड.राऊत आयोजित करीत असतात.

अपंग बांधवांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगून त्यांनी संस्थेच्या पदाधिकारी यांचे आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष श्री.शमीम शेख आणि कार्याध्यक्ष
जेष्ठ समाजसेवक, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त गंगाधर म्हात्रे यांनी ऍड.निलेश राऊत यांना नियुक्ती पत्र पालघर येथे प्रदान केले.
यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष वसई तालुका प्रमुख कु.प्रथमेश बांदेकर यांची सुध्दा वसई तालुका सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.



